Wednesday, November 25, 2015

वस्त्र योजना

Amber Charkha, Spinning, Devotees, Uniforms, Hanks, Progress, Kolhapur, Shraddhavan
वस्त्र योजना : आता शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनात रंग भरतील बहुरंगी युनिफॉर्म्स

हरि ॐ. सद्‍गुरु बापूंनी ३ ऑक्टोबर २००२ रोजी १३ कलमी कार्यक्रमाच्या घोषणेच्या वेळी "वस्त्र योजना" हा अत्यंत महत्वाचा उपक्रम कार्यान्वित केला होता. बापूंनी ह्या "वस्त्र योजने"च्या निमित्ताने श्रद्धावानांच्या भक्ति आणि सेवा ह्या दोन मूलभूत अंगांना एकत्रितरित्या विकसित करणार्‍या "चरख्याची" सर्व श्रद्धावानांना नव्याने ओळख करून दिली. भारताच्या दुर्गम भागात वसलेल्या गरीब, कष्टकरी समाजातील विद्यार्थी वर्गाला आर्थिक अडचणींमुळे गणवेश विकत घेणे परवडत नाही व अशा भागांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अनियमित हजेरीमागचे हे एक प्रमुख कारण आहे ह्याची सद्‍गुरु बापूंनी आपल्या श्रद्धावान मित्रांना जाणीव करून दिली. अशा विद्यार्थ्यांच्या जीवनातील विकास खुंटित होऊन त्यांची प्रगती खंडित होते व एक जबाबदार भारतीय नागरिकाच्या भूमिकेतून अशा विद्यार्थ्यांना आधार देणे ही प्रत्येक श्रद्धावानाची नैतिक जबाबदारी आहे हे सांगून बापूंनी सर्व श्रद्धावानांना जागरूक केले. बापूंच्या सांगण्यानुसार आज अनेक श्रद्धावान आपल्या घरी हा चरखा अत्यंत प्रेमाने व भक्तिभावाने पवित्र मंत्राचे उच्चारण करत चालवितात आणि ह्या चरख्यातून निघणार्‍या सूतापासून संस्थेतर्फे गणवेश बनविले जातात.